विष्णु राठोड! गेवराई…
तालुक्यातील सिरसदेवी या गावात लाईन मन खरात यांचा मनमानी कारभार चालू असून लाइनमन खरात यांच्यामुळे मिटर धारकांना त्रास तर अकड्या वाल्याना खुलेआम सूट दिली जात असल्याचे उघडकीस आले आहे.तसेच लाइनमन खरात यांची दादागिरी वाढली असून खरात यांना विचारले असता मिटर धारकांना नोटीस न देता तुम्ही विज कनेक्शन कट करू शकत नाहीत असे बोलल्यानंतर खरात म्हणतात तुम्हाला काय करायचे ते करा माझे काही होऊ शकत नाही अशी भाषा वापरणे कितपत योग्य आहे अश्या मुजोर लाइनम खरात यांच्यावर वरिष्टानी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सविस्तर माहिती अशी कि, आज दिनांक 12/03/2026 वार गुरुवार रोजी सिरसदेवी गावाला लाभलेले लाइनमन यांनी गावात अनेक मिटर धारकांचे विज कनेक्शन मिटर धारकांना नोटीस न देता कट केले आहे यामुळे मिटर धारकांमध्ये लाइनमन खरात यांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. विद्युत अधिनियम 2003 चे कलम 56 नुसार प्रत्येक मिटर धारकांचे बिल जर थकीत झाले असेल आणि ते वेळेवर भरले नाही तर त्यांना विज मिटर कनेक्शन कट करण्याच्या अगोदर नोटीस देणे बंधनकारक आहे जर नोटीस देऊन सुद्धा मिटर धारकांने 15 दिवसाच्या आत बिल भरले नाही तर विज कनेक्शन कट केले जाऊ शकते परंतु लाइनमन खरात यांच्याकडून कसल्याही प्रकारची नोटीस मिटर धारकांना न देता सिरसदेवी गावामध्ये मिटर धारकांचे विज कनेक्शन तोडले जात आहे तसेच लाइनमन खरात यांचा मनमानी कारभार चालू असल्याचे दिसत आहे.
तसेच लाइनम खरात यांच्याकडून सिरसदेवी गावातील आकडे धारक बऱ्याच पैकी आहेत याच्यावर कारवाई करण्यास सांगितलं तर उलट खरात म्हणतात ते आम्हांला माहिती नाही, आम्हाला आकडे दिसत नाहीत, आमचे कर्मचारी आल्यावर आम्ही बघू, आमच्या वरिष्टानी आम्हांला सांगितल्यावर आम्ही कारवाई करू असे बेजबाबदार उत्तर नागरिकांना देतात यामुळे अश्या मुजोर आणि बेशिस्त, मनमानी करणाऱ्या लाइनमन खरात यांच्यावर निलंबण केले पाहिजे अशी मागणी सिरसदेवी नागरिकांमधून आणि मिटर धारकांमधून होत आहे.
विशेष म्हणजे सिरसदेवी येथील सप्टेंशन च्या आवारात खुलेआम आणि उघडे विद्युत तरावर आकडे टाकले आहेत खुलेआम विजचोरी होत असून याकडे कुठल्याच महावितरणच्या कर्मचाऱ्याचे किंवा इंजिनिअर यांचे लक्ष नसून सिरसदेवी गावातील विज चोरी आणि आकडेवाल्यांची संख्या ही लाइनम खरात यांच्या आशिर्वादामुळे होत असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.