महाराष्ट्र

मुंबई येथील गुरव समाजाच्या मोर्चाला समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे – भक्तिदास रायते

भारतीय संघर्ष Live...

 

गेवराई ! विष्णु राठोड. 

दि.१३ (प्रतिनिधी) :- गुरव समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी तसेच गुरव समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष – अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मंगळवार दि.१७ मार्च २०२६ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला गुरव समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे गेवराई तालुकाध्यक्ष – भक्तिदास यमुनादास रायते (पुजारी) यांनी केले आहे. वेगवेगळ्या मंदिरात देव-देवतांची पुजाअर्चा करण्याचा हक्क गुरव समाजाला असून त्यांची उपजीविका देखील त्यावरच अवलंबून आहे. परंतु बहुतांश ठिकाणी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून मुळ हक्कदार असलेल्या पुजाऱ्यांना विनाकारण त्रास देणे, मंदिरात पेटया बसविणे, संस्थानची जमीन पुजाऱ्यांना वहिती करू न देणे आदी प्रकार घडत आहेत. हा त्यांच्यावर एकप्रकारे अन्याय असून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व गुरव समाजाचे हक्क – अधिकार अबाधित राहावे यासाठी मुंबई येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गुरव समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या शासनाने मान्य करून न्याय द्यावा यासाठी मंगळवार दि.१७ मार्च रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चाला गुरव समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय गुरव समाज संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष – संजय कल्याणराव गुरव व गेवराई तालुकाध्यक्ष भक्तिदास यमुनादास रायते (पुजारी) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकारद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button