महाराष्ट्र

कडक उन्हात १२ वर्षीय सादियाचा संयम; सलग २० उपवास पूर्ण करत जोपासली परंपरा…….

भारतीय संघर्ष Live....

 

गेवराई ! विष्णु राठोड…

सध्या उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार जात असताना आणि अंगाची लाहीलाही होत असताना,दैनिक वास्तव चे गेवराई प्रतिनीधी शेख खाजा यांच्या एका १२ वर्षांच्या चिमुकलीने आपल्या प्रबळ इच्छाशक्तीचे दर्शन घडवले आहे. सादिया शेख या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने रमजान महिन्याचे सलग २० उपवास (रोझे) अत्यंत निष्ठेने पूर्ण केले आहेत.
रमजानचा महिना म्हणजे मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र काळ. पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाणी न घेता हे उपवास केले जातात. यंदा उन्हाळ्याची तीव्रता मोठी असल्याने मोठ्या माणसांनाही उपवास करणे कठीण जात आहे. मात्र, सादियाने पहाटेच्या ‘सेहरी’पासून ते संध्याकाळच्या ‘इफ्तार’पर्यंत न डगमगता आपले रोजे सुरू ठेवले आहेत.
सादियाने केवळ उपवासच केले नाहीत, तर ती आपले शालेय अभ्यासाचे वेळापत्रकही न चुकता पाळत आहे. “सुरुवातीला थोडे कठीण गेले, पण आता सवय झाली आहे. अल्लाच्या कृपेने मला थकवा जाणवत नाही,” असे सादियाने आनंदाने सांगितले.
तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुटुंबातील सदस्यांनी आणि शेजाऱ्यांनी सादियाच्या या संयमाचे आणि धार्मिक निष्ठेचे अभिनंदन केले आहे. या कोवळ्या वयातील तिची ही जिद्द अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button