महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील शिरसमार्गच्या सुपुत्राची वैद्यकीय क्षेत्रात झेप – डॉ. सुहास शारदा सुदामराव शेजाळ झाले हृदयरोगतज्ज्ञ,

भारतीय संघर्ष Live...

 

गेवराई!विष्णु राठोड..

बीड जिल्ह्यातील शिरसमार्ग येथील सामान्य कुटुंबातील सुपुत्र डॉ. सुहास शारदा सुदामराव शेजाळ यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत हृदयरोगतज्ज्ञ (Cardiologist) म्हणून मानाचा टप्पा गाठला आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत मोठ्या वैद्यकीय संस्थांमध्ये पोहोचत त्यांनी यशाचा हा प्रवास पूर्ण केला आहे.
डॉ. सुहास शेजाळ यांचे प्राथमिक शिक्षण जयभवानी विद्यालय, गढी येथे झाले. त्यानंतर त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणात सातत्याने प्रगती करत त्यांनी सन २०१३ मध्ये NEET परीक्षेत यश मिळवून वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश केला.
यानंतर त्यांनी मुंबई येथील जी. एस. मेडिकल कॉलेज (KEM Hospital) या देशातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS पदवी संपादन केली. पुढे मुंबई येथील जे. जे. हॉस्पिटल येथे MD (Medicine) पदवी पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात आपली वाटचाल अधिक भक्कम केली.
हृदयरोग विषयातील उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील रूबी हॉल क्लिनिक येथे DrNB (Cardiology) ही पदवी यशस्वीरित्या प्राप्त केली. या प्रवासात त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, अभ्यास आणि समर्पणाच्या जोरावर हे यश संपादन केले.
डॉ. सुहास शेजाळ यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गेवराई तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय शिवाजीराव(दादा) पंडित, आदरणीय अमरसिंह (भैय्या साहेब) पंडित, जयभाऊ पंडित आमदार विजयसिंह पंडित यांच्या सह सर्व शिवछत्र परिवाराचे सदस्य,कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वांनी अभिनंदन केले आहे. सुहासच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button