महाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचा काळा दिवस !

भारतीय संघर्ष Live..

अहिल्यानगर:(प्रतिनिधी).. 

पारनेर हादरले! कीर्तनकार ‘महाराजा’चा अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार. वारकरी संप्रदायाला काळिमा! वारकरी शिक्षण संस्थेच्या नावाखाली वासनेचा बाजार. आरोपीच्या क्रूरतेचा कळस. आरोपीला पारनेर पोलिसांनी तात्काळ अटक केली.

पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने १७ वर्षीय मुलीवर पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केला.

गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केली. पीडित इयत्ता आठवीपासून पीडित. आरोपी शेजारी राहत असल्याने आणि भावाचा संस्थेत सचिव असल्याने फायदा घेतला. २०२१ पासून बळजबरी शरीरसंबंध. विरोध केल्यास कुटुंब संपवण्याची धमकी दिली.

१० मार्च २०२६ रोजी फोन करून घरी बोलावले. नकार दिला तरी धमकी. कॉम्प्युटर रूममध्ये बांबूने मारहाण, गरम पक्कडीने चटके, मग अत्याचार.

१४ मार्चला भावाला सांगितले. फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी BNS व POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. जिल्ह्यात संताप. ग्रामस्थांनी भोंदू महाराजावर कठोर कारवाईची मागणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button