गेवराई! विष्णु राठोड …
गेवराई तालुक्यातील
तलवाडा जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा सचिव ॲड सुरेशराव हात्ते यांच्या वतीने सोमवार रोजी मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात हिंदू मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सामाजिक सलोखा दाखवून दिला.

मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू असून प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी ही तलवाडा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा जिल्हा सचिव ॲड सुरेशराव हात्ते यांच्या वतीने मरकस मज्जित याठिकाणी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या रोजा इफ्तार ला तलवाडा आणि परिसरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत सामाजिक सलोखा दाखवून दिला असून या कार्यक्रमास तलवाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर,उपनिरीक्षक स्वप्नील कोळी,माजी उपसरपंच शेख शहनशहा सौदागर,शेख रफीकभाई, डॉ. राम धुमक,सय्यद मुख्तारअली,पठाण खामरखा,वजीरभाई कुरेशी,माजी सरपंच राधाकिसन शिंगणे,पोलिस अंमलदार काकडे,पत्रकार बापू गाडेकर,सुभाष शिंदे,तुळशीराम वाघमारे,विष्णु राठोड,आर आर बहिर,अल्ताफ कुरेशी,कुरेशी मौलाना,शेख मकसूद,कुरेशी मैनुभाई, कुरेशी शफीक,पठाण बनेखा,शेख साजद मिस्री,किशोर हाते यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
